IND vs SA: विशाखापट्टणमच्या मैदानावर क्विंटन डिकॉकचं शानदार शतकं! डिव्हिलियर्स-गिलख्रिस्टचा रेकॉर्ड उध्वस्त
वाइजैग विशाखापट्टणमच्या मैदानावर क्विंटन डिकॉकने (Quinton de Kock) आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने धमाकेदार शतक ठोकले. या शतकामुळे या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षक फलंदाजाने एबी डिविलियर्स (Ab devilliers & Adam Gilchrist) आणि ऍडम गिलक्रिस्ट यांचे मोठे विक्रम मोडले आहेत. त्याने हर्षित राणाच्या गोलंदाजीवर षटकार मारून आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 22 वे शतक पूर्ण केले.
विशाखापट्टणममध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली नव्हती. अर्शदीप सिंगने रायन रिकेल्टनला शून्यावर बाद केले. यानंतर, डिकॉकला कर्णधार टेम्बा बावुमाची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. बावुमा 48 धावांवर बाद झाला. मात्र, डिकॉकने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि 80 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याने 89 चेंडूंचा सामना करत 106 धावांची दमदार खेळी केली, ज्यात 8 चौकार आणि 6 मोठे षटकार समाविष्ट होते.
डिकॉकने भारताविरुद्ध 7 शतके झळकावत एबी डिविलियर्स (6 शतके) याला मागे टाकले. या यादीत तो सनथ जयसूर्या सोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहोचला आहे. डिकॉकने ऍडम गिलक्रिस्टलाही मागे टाकले आहे. डिकॉकने परदेशात खेळताना सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) बरोबरी साधली आहे. दोघांच्या नावावरही आता सात शतके आहेत. या यादीत रोहित शर्माचे (Rohit Sharma) नावही आहे. यासोबतच त्याने कुमार संगकाराच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.
Comments are closed.