लंडनच्या हीथ्रो विमानतळावर‘मिरची स्प्रे’ हल्ला, 21 जखमी

लंडनमधील हीथ्रो विमानतळावर रविवारी सकाळी अज्ञात इसमांनी ‘मिरची स्प्रे’ हल्ला केला. यात 21 प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे, तर काही लोक फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा दहशतवादी हल्ला वाटत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हीथ्रो विमानतळावरील टर्मिनल तीनवर ही घटना घडली. अज्ञात इसमाच्या एका गटाने सकाळी अचानक प्रवाशांवर मिरची स्प्रे फवारले. त्यामुळे प्रवासी अचानक खोकू लागले. अनेकांचा घसा व डोळे जळजळू लागले. एकाच वेळी इतक्या लोकांना त्रास होऊ लागल्याने घबराट उडाली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. या घटनेत 21 जण जखमी झाले असून 5 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments are closed.