मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचा पुढाकार, 14 डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन

मुंबईसह राज्यात बंद पडणाऱया मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास पेंद्राने पुढाकार घेतला आहे. या ज्वलंत विषयावर विचारविनिमय करण्यासाठी 14 डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
शिवाजी मंदिर दादर येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुंबईतील मराठी शाळांतील विद्यार्थी, पालक प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी अभ्यास पेंद्राकडून करण्यात आले आहे. या संबंधी बोलताना आनंद भंडारे म्हणाले की, मुंबईतील अनेक मराठी शाळा बंद पडल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. मुंबई महानगरपालिकेकडून ठरवून या शाळा बंद पाडण्याचा कारभार केला जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही राज ठाकरे यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठी शाळांचा मुद्दा घ्या अशी विनंती केली. ती विनंती राज ठाकरे यांनी मान्य केली. दरम्यान, मराठी शाळा बंद पडत असताना मराठी अभ्यास पेंद्राचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दोन वर्षांत 17 मराठी शाळा बंद
मुंबईतील एका इमारतीत पार्ंकग लॉटमध्ये मराठी शाळा दिली. मग कोण पालक आपल्या मुलांना अशा शाळेत पाठवणार? आज मुंबईत मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या तर भविष्यात राज्यभरातील सर्व मराठी शाळा बंद पडतील. गेल्या दोन वर्षात 28 पैकी 17 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल, असे आनंद भंडारे यांनी सांगितलं.

Comments are closed.