जन धन खात्यातील एकूण ठेवी 2.74 लाख कोटींच्या पुढे आहेत
लाभार्थींची संख्या 57 कोटीपेक्षा अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान जन धन योजनेच्या लाभार्थींची संख्या वाढून 57.11 कोटी झाली असून या खात्यांमध्ये 2,74,033.34 कोटी रुपये जमा आहेत. ही माहिती योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. देशात 13.55 लाख बँक मित्र पूर्ण देशात शाखारहित बँकिंग सेवा प्रदान करत आहेत. पूर्ण देशात जन धन खात्यांमध्ये आता सरासरी जमा रक्कम वाढून 4,815 रुपये झाली आहे.
सरकार चालू आर्थिक वर्षात एकूण 3.67 लाख कोटी रुपयांच्या थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा करण्याची योजना तयार करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारताच्या वित्तीय समावेशनाची यात्रा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. 2014 मध्ये सुरू झालेली पंतप्रधान जन धन योजना एक महत्त्वाचा पल्ला सिद्ध झाला असून यामुळे 57 कोटीहून अधिक लोक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेल्याचे वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू यांनी सांगितले आहे.
सद्यकाळात जन धन खात्यांमध्ये सुमारे 2.75 लाख कोटी रुपयांचा बॅलेन्स असून यामुळे सरासरी बॅलन्स सुमारे 4,815 रुपये इतका होतो. या खात्यांपैकी 78.2 टक्के ग्रामीण आणि निमशहरी भागांध्ये असून यात महिलांची हिस्सेदारी 50 टक्के आहे. भारताचा वित्तीय समावेशन निर्देशांक मार्च 2025 मध्ये वाढून 67 झाला आहे. देशात वित्तीय सेवांच्या विस्तारात सुधारासह गुणवत्तेतही वाढ होत असल्याचे यातून निदर्शनास येत असल्याचे नागाराजू यांनी नमूद केले आहे.
2021 मध्ये लाँच करण्यात आलेला वित्तीय समावेशन निर्देशांक बँकिंग, विमा, पेन्शन, गुंतवणूक आणि डाक सेवांसमवेत 97 संकेतांकावर आधारित आहे. याचे तीन उप-निर्देशांक विस्तार, वापर आणि गुणवत्ता हे पायाभूत सुविधांचा विस्तार मोजतात, तसेच लोक प्रत्यक्षात वित्तीय उत्पादनांचा वापर करतात की नाही हे देखील मोजले जाते.
Comments are closed.