BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा भाजप-शिवसेना सामोपचाराने सोडवणार  जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांची समन्वय समिती बनवणार  तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवणार  शिवसेना १२५ जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवणार असल्याची माहिती

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या –  8 DEC 2025

आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, प्रथमच विरोधी पक्षनेत्याविनाच चालणार कामकाज, शेतकरी, जनतेला अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार लक्षवेधीद्वारे करणार, नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप
महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्राने नाकारलं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसांची माहिती…शक्ती विधेयक २०२०-२१ मध्ये विधिमंडळात मंजूर झालं होतं मंजूर…केंद्रानं मात्र  नाकारलं
नगरविकास विभागाकडून मुंबईतील सायनचा २ एकर भूखंड विहिंपला भाडेतत्त्वावर देण्याचा शासन निर्णय जारी…एकरकमी ९ कोटी ७ लाखंचा प्रिमियम तर दरवर्षी १० हजार १८६ रूपये भाडं…
पीएम किसान सन्मान योजनेतून राज्यातले हजारो लाभार्थी शेतकरी वगळले, आधार आणि ईकेवायसी रखडल्याने नागपूर जिल्ह्यातून ९ हजार १६१ लाभार्थी वंचित, ईकेवायसी केल्यावरही अनेकांना पुढील हफ्त्याचा निधी नाहीच
वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आज चर्चा, पंतप्रधान मोदी करणार चर्चेची सुरूवात
सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनाचं काही पर्यावरण प्रेमींना आज चर्चेसाठी आमंत्रण. चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका आणि वृक्षतोडीचे कारण समजून घेणे महत्त्वाचे ठरणार.
जुनी पेन्शन आणि टीईटी संदर्भातील मागण्यांसाठी शिक्षकांचे आज आझाद मैदानात आंदोलन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्दे आणि मागण्या यावर लक्ष वेधण्यात येणार.
बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्यास कर्नाटक सरकारनं परवनगी नाकारली…राजकीय पक्षांसह शिवसेना नेत्यांनाही बंदी…आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध आंदोलन
गोवा नाईट क्लब अग्निकांडप्रकरणी मुख्य मॅनेजरसह ४ आरोपींना अटक, तपासासाठी गोवा सरकारकडून सत्यशोधन समिती स्थापन, एका आठवड्यात अहवाल येणार
प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट यांना अटक, उदयपूरच्या एका डॉक्टरची ३० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप, राजस्थान आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई

Comments are closed.