Homemade Winter Cream: गोकर्णाच्या फुलापासून घरीच बनवा नैसर्गिक विंटर क्रीम
प्रत्येक स्त्रीला आपला चेहरा तेजस्वी दिसावा असं वाटत असतं. त्यातच हिवाळ्यात चेहऱ्याची निगा राखणं कठीण जातं. या दिवसांत त्वचेच्या समस्या वाढतात, ज्यामुळं चेहरा कोरडा, निस्तेज दिसतो. बाजारातील काही उत्पादने वापरूनही कधीकधी परिणाम दिसत नाही. अशावेळी तुम्ही आरोग्यासाठी गुणकारी असलेलं गोकर्णाचं फुल वापरून एक विंटर क्रीम तयार करू शकता. हे क्रीम लावल्यानंतर तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार दिसेल. ( Homemade Winter Cream From Aparajita Flowers )
गोकर्णाच्या फुलापासूनचं क्रीम तयार करण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. यासाठी काही गोकर्णाची फुलं, गरम पाणी, कॉर्न फ्लोअर, बदाम तेल, कोरफडचं जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागतं. गोकर्णाची फुले स्वच्छ धुवा आणि पाण्यात १० मिनिटे उकळून घ्या. यामुळं त्याचा निळा रंग पाण्यात उतरतो. यानंतर एका भांड्यात कॉर्न फ्लोअर घ्या आणि त्यात फुलांचे पाणी मिसळा. नंतर त्यात कोरफडीचे जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि बदाम तेल मिसळा. यानंतर हे क्रीम हवाबंद डब्ब्यात ठेवा.
हेही वाचा: Tanning Removal Tips: २० मिनिटांतच टॅनिंग करा दूर; बेसनात हे घटक मिसळून बनवा फेस पॅक
हे क्रीम दररोज रात्री तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि ५ मिनिटे मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवा. चेहऱ्यावर हे क्रीम लावल्याने कोरडेपणा कमी होतो. त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. मात्र ते लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे किंवा तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
Comments are closed.