लंडनच्या हीथ्रो विमानतळावर अज्ञातांकडून प्रवाशांवर हल्ला, एका आरोपीला अटक; तिघे फरार

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर तीन आरोपींनी प्रवाशांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ला करणाऱ्यांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघे पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. हिथ्रो विमानतळाच्या टर्मिनल 3 वर सकाळी 8.11 वाजता ही घटना घडली. संशयित आरोपींनी प्रवाशांवर मिरची पावडरचा स्प्रे मारला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हल्लेखोर आणि पीडित नागरिक एकमेकांच्या ओळखीचे असून आपसातील वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अटक केलेल्या आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर हिथ्रो विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Comments are closed.