भाजपने दिल्ली सारख्या राज्यात सर्कस तयार केली आहे, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या विधानाचा आदित्य ठाकरे यांनी घेतला समाचार

प्रदूषण म्हणजे तापमानचं असतं असं विधान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुप्ता यांच्या विधानाचा समाचार घेतला. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “सभेत दिलेली विधाने पाहून दिल्लीच्या नेतृत्वाची स्थिती किती खालावली आहे हे दिसून येते.”
परिषदेत मुख्यमंत्री बोलताना “AQI हा एक तापमान आहे” आणि त्यावर पाणी मारणे हीच एकमेव उपाययोजना आहे” अशी वक्तव्ये केल्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “जर बनावट मतदान झाले नसते, तर दिल्लीने इतक्या अधोगतीकडे झेप घेतली नसती.” तसेच “भाजपने राज्यात सर्कर तयार केली आहे. जेणेकरून लोक हसत-खेळत व्यस्त राहतील आणि दरम्यान देश सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाली जात राहील.” असेही आदित्य ठाकरे म्हणाले. दिल्लीतील प्रशासनाची प्रत्येक जबाबदारी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका एका पक्षाच्या ताब्यात असूनही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.
“राष्ट्रीय राजधानीची पुनर्कल्पना” आणि “नवीन ब्लू प्रिंट” असे स्पष्टपणे सांगणाऱ्या टीव्हीवरील एका सत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री बोलताना पाहिले…
जिथे मुख्यमंत्री म्हणतात “AQI एक ऐसा तापमान है”… “पाणी देणे हा एकमेव उपाय आहे” आणि असे इतर रत्न…जर फसव्या मतांसाठी नाही तर, मी खरोखरच नाही… pic.twitter.com/CIKpFxx3IY
— Aaditya Thackeray (@AUThackeray) ८ डिसेंबर २०२५

Comments are closed.