शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात ग
जळगाव गुन्हे: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) शहरातील सेंट अलायन्स स्कूल तर्फे सद्भावना दिवसाच्या निमित्ताने 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शहरातील विविध धार्मिक स्थळांची सहल आयोजित करण्यात आली होती. मात्र या सहलीदरम्यान एका धार्मिक स्थळी प्रवेश करताना काही विद्यार्थिनींना स्कार्फ बांधण्यास भाग पाडण्यात आल्याचा आणि त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना धार्मिक विषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणाची माहिती पालकांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. विद्यार्थ्यांना न सांगता धार्मिक आचारांचे पालन करवून घेण्याचा शाळेचा हा प्रकार असल्याचा आरोप करत काही हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेत शाळेविरोधात कारवाईची मागणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून या विषयावर शहरात वातावरण तापले होते.
Jalgaon Crime: मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन भुसावळचे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोले यांनी स्वतः भुसावळ शहर पोलिस ठाण्यात उपस्थित राहून सेंट अलायन्स शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित आठ शिक्षकांविरोधात फिर्याद दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भुसावळ शहर पोलिसांनी मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांवर गुन्हा नोंदवला असून शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर शाळा प्रशासनाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून पालक आणि स्थानिक संघटनांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा भंग झाला का, याची तपासणी आता पोलिस व शिक्षण विभाग करणार आहे.
Jalgaon Crime: भुसावळात शेअर मार्केटच्या आमिषाने 19 लाख रुपयांत फसवणूक
दरम्यान, शेअर बाजारातून अधिक नफा मिळवून देतो या आमिषाने भुसावळ येथील एका व्यक्तीला 19 लाख 1 हजार 999 रुपयात फसविण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत नत्थू प्रसाद प्रजापती (वय 49, रा. जगदिश नगर) यांनी म्हटले आहे की, के स्ट्रॅटेजी क्लब आणि धोरणात्मक व्यापार गट या नावाने चालणाऱ्या ऑनलाइन ट्रेडिंग गटात त्यांना सहभागी करण्यात आले. गटातील प्रिती यादव, निता जैन या दोन महिलांनी तसेच गटाचा परदेशी नावाचा प्रशासक या व्यक्तीने विविध मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. तसेच शेअर मार्केटिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले.
या आश्वासनांवर विश्वास ठेवत प्रजापती यांनी 9 ऑगस्ट ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन 19 लाख रूपये पाठवले. पण त्यांना कुठल्याही प्रकारचा नफा मिळाला नाही. सदर घटनेत भामट्यांनी विविध कंपन्यांच्या सात मोबाइल क्रमांकाचा वापर संवाद प्रजापती यांच्याशी साधण्यासाठी केला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. जास्त पैशाच्या आमिषाला अनेकजण बळी पडता आहे. जास्त पैसे अथवा मोफत वस्तू कोणीही देत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या कॉलला प्रतिसाद देऊ नये. या विषयी जनजागृती केली तरी नागरिक अनोळखी कॉलला प्रतिसाद देतात. हे चुकीचे आहे. स्वतःची फसवणूक टाळणे आपल्याच हातात असल्याने सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांनी केले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.