कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत सांगितल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी! प्लेइंग इलेव्हनबद्दल देखील केला खुलासा
कटकच्या बाराबती स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्यासाठी आता भारत आणि दक्षिण आफ्रिका (T20 Series IND vs SA) दोन्ही संघ तयार दिसत आहेत. दोन्ही संघामध्ये काही नवीन खेळाडू दिसत असल्यामुळे ही 5 सामन्यांची मालिका खूप खास ठरू शकते.
कटक टी20 सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत (Pre-Match Press Conference) भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मोकळेपणाने संवाद साधला. त्याने कटक टी20 सामन्यासाठीच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल मोठा खुलासा केला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, सध्या तरी टी20 फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाज म्हणून शुबमन गिल (Shubman gill) हा अभिषेक शर्मासोबत (Abhishek Sharma) खेळणार आहे. यासोबतच त्याने संजू सॅमसनला (Sanju Samson) आणखी संधी देण्याची गोष्ट बोलून दाखवली.
याशिवाय त्याने हे देखील स्पष्ट केले की, सलामीच्या फलंदाजांव्यतिरिक्त इतर सर्व खेळाडूंचा फलंदाजी क्रम (बॅटिंग ऑर्डर) कधीही बदलू शकतो. ज्यामुळे (टी20 मधील) बदलांचा हा टप्पा पुढेही चालू राहील.
शेवटी, सूर्याने सांगितले की, टी20 वर्ल्ड कप 2024 संपल्यापासूनच पुढील मोठ्या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे.
Comments are closed.