गोलंदाजांना धू धू धुतले, मैदान गाजवले; पण यंदा 5 खेळाडू IPL खेळताना दिसणार नाही; दोघांनी घेतला
IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2026) लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर रोजी अबुधाबी येथे होणार असून या लिलावात एकूण 350 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये 240 भारतीय तर 110 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या मिनी-लिलावापूर्वी, अनेक प्रमुख खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. या खेळाडूंनी 2025 पर्यंत आयपीएल गाजवली. परंतु ते आता आयपीएल 2026 च्या हंगामात खेळताना दिसणार नाहीत. आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावापूर्वी, अनेक प्रमुख आणि प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
1. मोईन अली
इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार नाही. मोईन अलीने सोशल मीडियावर आपला निर्णय जाहीर करून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले. मोईन अलीने 2025 च्या हंगामात केकेआरचे प्रतिनिधित्व केले, परंतु त्याची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. त्याने आयपीएलमध्ये एकूण 73 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 1167 धावा केल्या आणि 41 विकेट्स घेतल्या. मोईन अलीचा स्ट्राइक रेट 139.76 आणि इकॉनॉमी रेट 7.22 होता.
2. फाफ डु प्लेसिस- (फॅफ डु प्लेसिस)
मोईन अलीप्रमाणेच, फाफ डू प्लेसिसनेही सोशल मीडिया पोस्टद्वारे यंदा आयपीएलऐवजी पीएसएल खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. फाफने म्हटले की आयपीएलमधून बाहेर पडणे हा त्याच्यासाठी एक मोठा निर्णय होता. डू प्लेसिसने त्याच्या 13 आययपीएल हंगामांपैकी सात हंगाम सीएसकेकडून खेळला. 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यापूर्वी, तो 2022 ते 2024 पर्यंत आरसीबीचा भाग होता आणि आरसीबी संघाचे नेतृत्वही केले. फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये 135.78 च्या स्ट्राइक रेटसह 4773 धावा केल्या आहेत.
3. ग्लिन मॅक्सवेल- (ग्लेन मॅक्सेला)
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एका आश्चर्यकारक निर्णयात आयपीएलच्या लिलावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ग्लेन मॅक्सवेलने या निर्णयाचे विशिष्ट कारण सांगितले नाही. तथापि, त्याने भारतीय चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. आयपीएलमधील सर्वात यशस्वी परदेशी खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या मॅक्सवेलची गेल्या दोन हंगामात (2024 आणि 2025) कामगिरी खराब राहिली. ग्लेन मॅक्सवेलने 15 डावांमध्ये फक्त 100 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट 109.44 होता.
4. आंद्रे रसेल
वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने अलीकडेच आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) कडून सुरुवात केल्यानंतर, रसेल कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला आणि त्याच्या स्फोटक फलंदाजीने तो लवकरच संघाच्या सर्वात विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक बनला. त्याने आयपीएलमध्ये 140 सामने खेळले, 2651 धावा केल्या आणि 123 विकेट्स घेतल्या.
5. रविचंद्रन अश्विन
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही या वर्षी ऑगस्टमध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने त्याच्या ‘एक्स’ हँडलवर लिहिले की तो जगभरातील इतर टी-20 लीगमध्ये खेळण्यास तयार आहे. अश्विनने त्याची 16 हंगामांची आयपीएल कारकीर्द संपवली आहे. 187 विकेट्ससह तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर होता. त्याचा इकॉनॉमी रेट 7.20 होता. 2010 आणि 2011 मध्ये सीएसकेच्या जेतेपद विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.