टोरंटोहून मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्री नीलम कोठारी बेशुद्ध, वाचा नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांना टोरंटोमधून मुंबईला परत येताना विमानप्रवासात कोणत्या अडचणी आल्या हे मांडले आहे. त्या म्हणाल्या की, टोरंटोहून मुंबईला प्रवास करताना अचानक फ्लाइटमध्ये अस्वस्थ वाटू लागले. परंतु एअरलाइन्सकडून मात्र कोणतीही मदत न मिळाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

नीलम यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) एअरलाइनच्या अधिकृत पेजला टॅग करून लिहिले की, “टोरंटोहून मुंबईला जाणाऱ्या माझ्या अलिकडच्या फ्लाइटमध्ये मला मिळालेल्या वागणुकीमुळे मी अत्यंत निराश आहे. फ्लाइटला ९ तासांपेक्षा जास्त उशीर तर झालाच. शिवाय फ्लाइटमध्ये दिलेले जेवण खाल्ल्यानंतर मी बेशुद्ध पडले. माझ्या शेजारी बसलेल्या एका प्रवाशाने मला माझ्या सीटवर परत येण्यास मदत केली. परंतु फ्लाइट क्रूकडून मला कोणताही फॉलो-अप घेण्यात आला नाही. तसेच कुणी साधी चौकशीही केली नाही. त्यानंतर त्यांनी या फ्लाइटच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारची निष्काळजी हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

नीलम कोठारी यांनी एअरलाइनला टॅग केलेल्या या पोस्टवर एतिहाद एअरलाइन्सने उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, “हा आपला अनुभव वाचून आम्हाला खूप वाईट वाटले! कृपया आमच्याशी डीएम द्वारे संपर्क साधा, आम्ही चौकशी करू आणि तुम्हाला मदत करू! धन्यवाद!”

Comments are closed.