Face Massage : मसाज केल्याने चेहरा खरंच टवटवीत दिसतो का?
चेहऱ्यामुळे आपल्याला ओळख मिळते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर भागाच्या त्वचेपेक्षा अधिक नाजूक असते. त्यात हल्लीच्या बिझी शेड्यूलमुळे काळजी घ्यायला वेळ नसल्याने चेहऱ्याच्या नैसर्गिक चमकेवर दीर्घ परिणाम होत आहे. अशावेळी चेहरा टवटवीत दिसण्यासाठी नियमित फेस मसाज करावा असा सल्ला दिला जातो. पण, खरंच फेस मसाज केल्याने त्वचेच्या समस्या कमी होऊन चेहरा टवटवीत होतो का?
चेहऱ्याची काळजी घेण्याचा सर्वात सोपा मार्ग नियमित फेस मसाज करणे आहे. चेहऱ्याच्या त्वचेला मसाज केल्याने त्वचेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यासह त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. जर तुम्ही दररोज फक्त 5 मिनिटे मसाज केलात तर काय फायदे होतात समजून घेऊयात.
- चेहऱ्याच्या मसाजमुळे ब्लड प्रेशर वाढते.
- नियमित मसाज केल्याने बारीक रेषा कमी होण्यास मदत होते आणि सुरकुत्यांची समस्या जाणवत नाही.
हेही वाचा – Winter Skincare: रात्री चेहऱ्याला काय लावावं? थंडीत हेल्दी स्किनसाठी असं करा स्किनकेअर
- मसाज कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते.
- मसाज केल्याने त्वचा चमकदार आणि एकसमान होते.
- मुरूमे कमी होतात आणि डागांपासून मुक्ती मिळते, ज्यामुळे चेहरा टवटवीत दिसण्यास मदत होते.
मसाज कसा करावा?
- हात स्वच्छ धुवून घ्यावेत.
- चेहरा पाण्याने किंवा सौम्य फेसवॉशने धुवा आणि कोरडे करा.
- चेहऱ्यावर नैसर्गिक फेस मसाज जेल किंवा फेस ऑइल लावा.
- चेहऱ्याला वाफ द्या.
- हलक्या हाताने चेहऱ्याला वर्तुळाकार हालचाली करत मसाज द्यावा.
- हात वरच्या दिशेने उचला आणि मसाज करा.
- तुम्ही फेस रोलरने देखील मसाज करू शकता.
- मसाज केल्यानंतर मॉइश्चरायझर वापरा.
कोणते तेल वापराल?
फेस मसाज करण्यासाठी खोबरेल तेल, बदाम तेल, कॅमोमाइल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा फेस मसाज करू शकता. तसेच रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज करणे अधिक लाभदायी ठरू शकते.
हेही वाचा – Red Suits For Bride: नव्या नवरीसाठी रेड सूट; ट्रेंडिंग आहेत ‘हे’ डिझाईन
Comments are closed.