Women Health: पिझ्झा, मोमोच्या मोहामुळे वाढतोय PCOD आणि PCOS, स्त्रीरोग तज्ञांनी सांगितलं सत्य

आजच्या काळात तरुण मुली आणि महिलांमध्ये PCOD आणि PCOS सारखे त्रास झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मासिक पाळी बिघडणे, वजन वाढणे, हार्मोन्सचा असमतोल अशा अनेक समस्या यामध्ये दिसतात. पण हे नेमकं का होतंय? यामागे फक्त आजार नाहीतर आपल्या रोजच्या जीवनातील बदललेली सवय सुद्धा मोठं कारण असल्याचं दिसत आहे. (pcod pcos causes fast food lifestyle weight gain tips marathi)

फास्ट फूड आणि बाहेरचं खाणं मोठं कारण
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते सध्याच्या व्यस्त जीवनात अनेकजणी बाहेरचं खाणं अधिक निवडतात. पिझ्झा, मोमो, मॅगी, पॅकेज स्नॅक्स आणि फास्ट फूड यामुळे शरीरात तेल, मीठ आणि प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण वाढतं. हे पदार्थ सतत खाल्ल्याने हार्मोन्सवर परिणाम होतो आणि शरीरात चरबी साचते. त्यामुळे PCOD आणि PCOS चा धोका वाढतो.

बैठी जीवनशैली आणि ताण
दिवसभर बसून काम करणे, कमी हालचाल, व्यायामाचा अभाव आणि वाढता ताण याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. झोपेची कमतरता आणि अनियमित दिनचर्या यामुळेही हार्मोन्सचा समतोल बिघडतो. त्याचबरोबर वजन खूप वाढल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम अंडाशयांवर होतो. त्यामुळे पाळी अनियमित होते, अंडोत्सर्जन थांबू शकतं आणि PCOS ची लक्षणं वाढतात.

ही समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात काही सोप्या गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे.
1.घरचे आणि हलके जेवण जास्त खाणे
2.रोज किमान 30 ते 40 मिनिटे व्यायाम करणे
3.फळे, भाज्या, कडधान्य, डाळी यांचा आहारात समावेश करणे
4.पॅकेज्ड आणि बाहेरचे तेलकट पदार्थ कमी खाणे
5.ताण कमी ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे

नियमित काळजी घेतली तर पीरियड्स नियमित राहतात, वजन नियंत्रणात राहतं आणि PCOD किंवा PCOS चा त्रास कमी होतो.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. पण योग्य आहार, योग्य सवयी आणि नियमित व्यायामामुळे PCOD आणि PCOS वर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. त्यामुळे या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं तर आरोग्य चांगलं राहू शकतं.

Comments are closed.