भाजपच्या उमेदवाराकडून मी हसीना पारकर असल्याचे सांगत प्रचार, मतदारांना धमक्या; ओमराजे निंबाळकरां

ओमराज निंबाळकर: उमरगा नगरपरिषद निवडणुकीच्या (Umarga Municipal Council elections) पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण तापलेले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे उमरगा शहरातील काही मतदान केंद्रांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पत्रात मतदार केंद्रांवर होणाऱ्या दहशतीचा तपशील देण्यात आला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रात आरोप केला आहे की, उमरगा शहरातील प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये सराईत गुन्हेगार व्यंकट धोत्रे आणि त्यांच्या बंधूंच्या टोळीची दहशत पसरलेली आहे. या टोळीतील शंभर ते दीडशे गुंड असल्याचा उल्लेख केलेला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील या गुंडांची दहशत मतदारांवर पाहायला मिळाली होती, ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पाडणे कठीण झाले.

Omraje Nimbalkar: भाजपच्या उमेदवाराकडून मी हसीना पारकर असल्याचे सांगत प्रचार

ओमराजे निंबाळकरांच्या पत्रानुसार, आता व्यंकट धोत्रे यांच्या बहीणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या प्रभागातील मतदारांवर दहशतीचा मोठा दबाव आहे. खासदारांच्या आरोपानुसार, त्या स्वतःला “मी हसीना पारकर आहे” असे सांगून मतदारांना धमकावत आहेत आणि “मला मतदान करा” असा प्रचार करत आहेत. या परिस्थितीत मतदार पूर्ण दहशतीखाली आहेत.

उमरगा नगरपरिषद निवडणूक: राजकीय वातावरण हेमोर

यामुळे खासदारांनी विनंती केली आहे की, प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील आगामी मतदान केंद्र अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, जेणेकरून मतदारांना सुरक्षित वातावरणात मतदान करता येईल. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  आरोप केलेले उमेदवार भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याने उमरगा शहरात निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण अधिक तापलेले आहे. आता निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासन या दहशतीच्या परिस्थितीवर कशी कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली

Raj Thackeray Thane Court: न्यायाधीशांनी विचारलं, गुन्हा कबूल आहे का?; राज ठाकरे म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही, ठाणे कोर्टात काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.