थायलंड-कंबोडिया युद्धामुळे 700 शाळा बंद

थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सीमावादवरून पेटलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. कंबोडियाचे सिनेट अध्यक्ष हन सेन यांनी भीषण युद्धाचे संकेत दिल्याने या दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढला आहे. थायलंडच्या सीमावर्ती भागातील 700 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर कंबोडियात 1.27 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून शेकडो शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या आठवडय़ात झालेल्या गोळीबारात थायलंडचे पाच सैनिक जखमी झाले. तर कंबोडियात 7 जणांचा मृत्यू आणि 20 जण जखमी झाले आहेत.

Comments are closed.