एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल : आशिष नेहरा

IND vs SA शुभमन गिल आशिष नेहरा नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारतानं विजय मिळवला तर दुसऱ्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताला पराभूत केलं. दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा टी 20 मधील उपकॅप्टन शुभमन गिल अपयशी ठरला. शुभमन गिल पहिल्या मॅचमध्ये 4  धावा करुन बाद झाला तर दुसऱ्या मॅचमध्ये खातं उघडू शकला नाही. कसोटी मालिकेत झालेल्या दुखापतीनंतर शुभमन गिलनं टी 20 मालिकेत पुनरागमन केलं. मात्र, दोन्ही मॅचमध्ये चागंली फलंदाजी करु न शकल्यानं शुभमन गिलवर टीका केली जात आहे. शुभमन गिलवर टीका केली जात असताना गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा मात्र गिलच्या समर्थनार्थ पुढं आला आहे. टी 20 सारख्या फॉरमॅटमध्ये दोन सामन्यातील कामगिरीच्या आधारावर एखाद्या खेळाडूला नाकारणं हा लगचेच निष्कर्ष काढण्याची प्रवृत्ती वाढल्याचं लक्षण असल्याचं आशिष नेहरानं म्हटलं.

आकडेवारी पाहून टीका होतेय : आशिष नेहरा

आशिष नेहरा म्हणाला की भारतात टीकेचं मूळ फक्त आकडेवारी पाहून निष्कर्षावर पोहोचणं हे आहे. आपली हीच समस्या आहे जर शुभमन गिल सारख्या खेळाडूच्या क्षमतेचं दोन-तीन मॅचमधील कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करणार असाल तर अवघड होईल, असं आशिष नेहरा म्हणाला.

तुमच्याकडे खूप पर्याय आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ऐवजी  साई सुदर्शन आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करु शकतात. तुम्हाला या दोघांना देखील हटवायचं असेल तर वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशन द्वारे डावाची सुरुवात करु शकता. पर्याय अधिक आहेत मात्र, तुम्ही एक दोन मॅचमध्ये पराभूत होता किंवा फलंदाज आणि गोलंदाजाची एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसेल तर बदलण्याची मागणी करत असाल तर अवघड होईल, असं आशिष नेहरानं म्हटलं.

नेहराकडून वॉशिंग्टन सुंदरचं कौतुक

वॉशिंग्टन सुंदरनं 2025 च्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून सहा सामने खेळले होते. तो फिट असेल तर यावेळी त्याचा पहिल्यापेक्षा जास्त उपयोग यावेळी करुन घेतला जाईल, असं नेहरानं म्हटलं. टीम इंडियामध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मात्र आशिष नेहरानं सुंदर चांगल्या दर्जाचा फलंदाज असल्याचं म्हटलं याशिवाय खेळपट्टीची मदत मिळाल्यास ऑफ स्पिनसह संपूर्ण पॅकेज बनतो, असं आशिष नेहरानं म्हटलं.

आशिष नेहरानं वॉशिंग्टन सुंदरकडे जे कौशल्य आहे त्यानुसार पहिल्यांदा एक फलंदाज आहे. तो सहाव्या किंवा सातव्या स्थानावर देखील फलंदाजी करु शकतो. परिस्थिती जशी असेल त्यानुसार तो फलंदाजी किंवा गोलंदाजी करु शकतो, असं नेहरानं म्हटलं.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी 20 मॅच धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यात कोणता संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.