विनेश फोगाट पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरणार; निवृत्तीचा निर्णय मागे, 2028 मधील ऑलिम्पिक खेळण्याची इच्छा

हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 2028 मध्ये लॉस एन्जेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त करत तिने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने ही माहिती दिली.
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने ती अपात्र ठरली होती आणि पदक जिंकण्याच्या आशांना सुरुंग लागला होता. त्यानंतर कुस्तीला रामराम करत ती राजकीय मैदानात उतरली होती. तिने काँग्रेसमध्ये प्रवेशही केला होता. त्यानंतर हरयाणामध्ये झालेल्या निवडणुकीत तिला तिकीट मिळाले आणि तिने जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला होता. विनेशने भाजपच्या योगेश कुमार यांना धुळ चारली होती.
— विनेश फोगट (@Phogat_Vinesh) १२ डिसेंबर २०२५

Comments are closed.