WTC च्या सध्याच्या गुणतालिकेत टीम इंडियाला फटका! पाकिस्तानही पुढे, तर न्यूझीलंडची मोठी झेप

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघाचे नुकसान झाले आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सनी पराभव करून गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान संघही टेबलमध्ये भारताच्या पुढे आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंड सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया 100% पॉइंट्स टक्केवारीसह पहिल्या स्थानावर कायम आहे.

पहिला क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून 100% पॉइंट्सने त्यांनी नुकत्याच झालेल्या ॲशेस 2025-26 मालिकेत इंग्लंडवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (SA) असून नुकतेच भारताला त्यांच्याच घरी कसोटी मालिकेत 2-0 ने हरवले आहे. तिसरा क्रमांक: न्यूझीलंड.

भारतीय संघ आता सहाव्या स्थानावर आहे, त्यांची पॉइंट्सची टक्केवारी 48.15 इतकी आहे. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची टक्केवारी 100 आहे. या मोठ्या फरकामुळे टीम इंडियाच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा कमी होत आहेत. विशेष म्हणजे, पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तान संघही भारताच्या पुढे पाचव्या स्थानावर आहे. जर ॲशेस मालिकेतील उर्वरित 3 सामन्यांमध्ये इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले, तर भारतीय संघ आणखी एक स्थान खाली सातव्या क्रमांकावर घसरू शकतो.

WTC च्या या चालू चक्रात भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून, त्यात केवळ 4 विजय मिळवले आहेत. श्रीलंका देखील एक स्थान खाली घसरून चौथ्या क्रमांकावर आली आहे.

भारतीय संघाला आता पुढील जवळपास 8 महिन्यांपर्यंत कोणतीही कसोटी मालिका खेळायची नाही. टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंकेसोबत होणार आहे. 2027 च्या WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता जिवंत ठेवायची असेल, तर भारताला उर्वरित जास्तीत जास्त सामने जिंकावे लागतील.

Comments are closed.