वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरे कापणार

भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरांची कत्तल करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने ऍड. जोऐल कार्लोस यांच्यामार्फत यासाठी अर्ज केला होता. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या तिवरांची कत्तल केल्यानंतर त्या बदल्यात नवीन तिवरांची झाडे लावली जातील. रोड तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी तिवरांची झाडे लावली जातील, असे पालिकेने न्यायालयाला सांगितले. यासाठी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने निकाल राखून ठेवला.

Comments are closed.