JioHotstar वर नाही, इथे पाहा भारत-पाकिस्तान सामना; वैभव सूर्यवंशी पुन्हा दिसणार धमाका, किती वाज

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कप 2025 : भारतीय स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया रविवारी पाकिस्तानविरुद्ध अंडर-19 आशिया कप 2025 चा दुसरा सामना खेळणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असेल, ज्याने मागील सामन्यात यूएईविरुद्ध 171 धावांची धमाकेदार खेळी खेळली होती. आपल्या आक्रमक आणि निर्भीड फलंदाजीने त्याने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र हा हायव्होल्टेज सामना कधी होणार? कुठे पाहता येणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरं इथे मिळणार आहेत.

भारत–पाकिस्तानची विजयी सुरुवात

शुक्रवार, 12 डिसेंबरपासून यूएईमधील दुबई येथे एसीसी अंडर-19 मेंस आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान यूएईचा 234 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) अपेक्षेप्रमाणेच वादळी फलंदाजी करत अवघ्या 95 चेंडूंमध्ये 171 धावा ठोकल्या आणि आपली छाप पाडली.

दुसरीकडे पाकिस्तान संघानेही पहिल्याच सामन्यात ताकद दाखवली. त्यांनीही 297 धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानकडून सलामीवीर समीर मिन्हास (Sameer Minhas) याने 177 धावांची जबरदस्त खेळी खेळली. आता या दोन्ही संघांची विजयी घोडदौड थेट एकमेकांवर आदळणार आहे. भारत–पाकिस्तान अंडर-19 सामना म्हणजे केवळ एक मॅच नाही, तर तो असणार थरार आणि भविष्यातील स्टार्सचा महासंग्राम आहे.

भारत-पाक LIVE सामना कधी, कुठे अन् कसा पाहायचा?

अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कधी, किती वाजता, कुठे खेळला जाईल?

या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रविवार, 14 डिसेंबर रोजी खेळला जाईल. या एकदिवसीय स्पर्धेतील सर्व सामने सकाळी 10:30 वाजता सुरू होतील. टॉस सकाळी 10 वाजता होईल. ग्रुप अ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जाईल.

टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामना कुठे पाहू शकतो?

हा सामना टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जात आहे आणि सोनी स्पोर्ट्स टेन-1 वर पाहता येईल.

भारत-पाकिस्तान सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग मी कुठे पाहू शकतो?

टीव्ही व्यतिरिक्त, अंडर-19 आशिया कप ऑनलाइन देखील प्रसारित केला जात आहे आणि भारत-पाकिस्तान सामन्याचे हे स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर पाहता येईल.

हे ही वाचा –

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.