रांची विमानतळावर मोठी दुर्घटना टळली.
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील रांची विमानतळावर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. इंडिगोच्या विमानाचे लँडिंग होत असताना त्याचा मागील भाग धावपट्टीवर आदळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखत विमानावर नियंत्रण मिळविल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सदर विमान भुवनेश्वरहून रांची येथे दाखल झाले होते. याप्रसंगी विमानात सुमारे 70 प्रवासी होते. लँडिंग करताना विमानाचा शेपूट धावपट्टीवर आदळला. प्रवाशांना धक्का बसला. तथापि, ते सर्व सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही इजा झालेली नाही, असे रांची विमानतळ संचालक विनोद कुमार यांनी सांगितले. या घटनेनंतर विमान उ•ाणासाठी तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आढळल्याने ते ग्राउंड करण्यात आले. तसेच रांची ते भुवनेश्वर हे पुढील नियोजित उ•ाण रद्द करण्यात आले. प्रवाशांना पर्यायी विमानाने किंवा रस्तामार्गाने भुवनेश्वरला रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed.