Winter Beauty Tips: हिवाळ्यात अशी राखा त्वचा आणि केसांची निगा; जाणून घ्या प्रभावी ब्युटी टिप्स
आजकाल थंडीत वाढ झाली आहे. सर्वत्र तापमान कमी झालं असून गारठा वाढला आहे. या वातावरणात त्वचेसह केसांच्या समस्या वाढतात. त्यामुळं त्वचा आणि केसांची काळजी घेणं कठीण असतं. मात्र आपल्या दैनंदिन दिनचर्येत काही गोष्टी फॉलो केल्यास तुम्ही सहज सोप्या पद्धतीने त्वचा आणि केसांची निगा राखू शकता. त्यासाठी काही सोप्प्या ब्युटी टिप्स जाणून घेऊया…( Winter Beauty Tips That Every Woman Must Know )
मॉइश्चरायझर
हिवाळ्यात त्वचा लवकर कोरडी होते. म्हणून सकाळी आणि रात्री चांगल्या दर्जाचं मॉइश्चरायझर वापरणे महत्वाचे आहे. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर क्रीम-बेस मॉइश्चरायझर निवडा. मॉइश्चरायझिंगमुळे त्वचा हायड्रेट राहते.
हायड्रेटिंग ड्रिंक्स
त्वचेची काळजी केवळ वरवर उत्पादने वापरून घेतली जात नाही. तर त्यासाठी तुम्ही योग्य संतुलित आहार घेणंही तितकंच गरजेचं आहे. हिवाळ्यात थंडीमुळं बहुतांश जण कमी पाणी पितात, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. त्यासाठी दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी, हर्बल टी किंवा फळांचा रस प्या. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास आणि चमक वाढण्यास मदत होते.
एक्सफोलिएशन
थंड हवेमुळे त्वचेवर मृत पेशी जमा होतात. त्यामुळं आठवड्यातून १-२ वेळा त्वचा स्क्रबने एक्सफोलिएट करा. यामुळे मृत पेशी निघून जातात आणि त्वचा मऊ आणि स्वच्छ राहते.
सनस्क्रीन
हिवाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश नसतो, पण तरीही सूर्याची किरणे हवेत मिसळतात. त्यामुळं सनस्क्रीनचा वापर करा. यामुळे सुरकुत्या आणि डाग कमी होतात.
केसांची निगा
हिवाळ्यात केस कोरडे होतात. त्यासाठी आठवड्यातून १-२ वेळा हेअर मास्क किंवा कंडिशनर लावा. तेलाने मालिश केल्याने केसांना मॉइश्चरायझेशन मिळते. तसेच गरम पाण्याने केस धुणे टाळा, कारण त्यामुळे कोरडेपणा वाढतो.
निरोगी आहार
हिवाळ्यात त्वचा आणि केसांसाठी योग्य पोषण आवश्यक आहे. त्यासाठी जीवनसत्त्वे ई, सी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. ड्रायफ्रूट, बिया, हिरव्या पालेभाज्या, मासे आणि हंगामी फळे तुमची त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
ओठांची निगा
थंड हवेमुळे ओठ फाटू शकतात. त्यासाठी चांगला लिप बाम वापरा. लिंबू आणि मधाची पेस्ट लावल्यास ओठ मऊ राहतात.
ताण
हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाश आणि थंड हवेचा देखील मूडवर परिणाम होतो. स्ट्रेसमुळं त्वचेवर सुरकुत्या आणि डाग दिसतात. त्यासाठ योग, ध्यान आणि पुरेशी झोप घ्या ज्यामुळं मनही शांत राहतं आणि त्वचाही निरोगी राहते.
Comments are closed.