श्वेता बंदरे यांना स्टार एज्युकेशनचा सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्कार

नेरुळ येथील गुरुवर्य बाळाराम पाटील इंग्लिश स्कूलच्या श्वेता बंदरे यांना स्टार एज्युकेशनचा सर्वोत्तम मुख्याध्यापिका पुरस्कार देऊन मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील, माजी मंत्री रवींद्र माने, पराग संस्थेचे सचिव सुभाष बने, संचालक पराग बने, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे, देवरुख शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.