घाऊक महागाई दरात किंचित वाढ
नोव्हेंबर महिन्यातील आकडा जारी :घाऊक महागाई दर उणे 0.32 टक्के
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाई दर किंचित वाढून उणे 0.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने घाऊक महागाई दर अधिक झाला आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात हा दर उणे 1.21 टक्के राहिला होता. तर सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 0.13 टक्के आणि ऑगस्टमध्ये 0.52 टक्के इतका होता. वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाई दराचे आकडे जारी केले आहेत.
दैनंदिन गरजांसाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचा महागाई दर उणे 6.18 टक्क्यांवरून वाढत उणे 2.93 टक्के झाला आहे. खाद्य महागाई दर उणे 5.04 टक्क्यांवरून वाढत उणे 2.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.
इंधन आणि ऊर्जेचा घाऊक महागाई दर उणे 2.55 टक्क्यांवरून वाढत उणे 2.27 टक्के राहिला. निर्मित उत्पादनांचा घाऊक महागाई दर 1.54 टक्क्यांवरून कमी होत 1.33 टक्के राहिला आहे.
किरकोळ महागाई दर
नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर वाढून 0.71 टक्के झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा 0.25 टक्के राहिला होता. नोव्हेंबर महिन्यात महागाईत वाढ भाज्या, अंडी, मांस-मासे, मसाले, इंधन आणि विजेच्यी किमती वाढल्याने झाली आहे. किरकोळ महागाईचे आकडे 12 डिसेंबर रोजी जारी झाले होते.
Comments are closed.