Bajra Benefits: संधिवात आणि सांधेदुखीने हैराण आहात? दररोज आहारात घ्या ‘ही’ भाकरी

हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं, कारण या ऋतूत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आहारात शरीराला उबदार ठरणारे पदार्थ या दिवसांत खावे. बाजरी हे या ऋतूत सुपरफूड मानलं जातं. आयुर्वेदात बाजरीची भाकरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बाळकृष्ण यांनी हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला आहे. ( Benefits of Eating Bajra Roti In Winter )

आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, बाजरीत कॅल्शियम, प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हिवाळ्यात दररोज बाजरीची भाकरी खाल्ल्याने संधिवात, सांधेदुखी आणि दमा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच बाजरीमुळे स्नायू मजबूत होतात. म्हणून, हिवाळ्यात दररोज बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर मानलं जातं.

हेही वाचा: Winter Fruits: हिवाळ्यात ठणठणीत राहण्यासाठी खा ही फळं; सर्दी- खोकला राहील दूर

बाजरीची भाकरी का असते आरोग्यदायी?
बाजरीत कॅल्शियम, प्रथिने आणि लोह यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात, हे घटक हाडे आणि स्नायू बळकट करतात. बाजरीच्या सेवनाने थंड हवामानात शरीर उबदार राहण्यास मदत होते. शिवाय बाजरी हे असं धान्य आहे जे शरीराला फायबर आणि कार्बोहायड्रेट्स प्रदान करते. यामुळं दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

बाजरी हे हिवाळ्यातील सुपरफूड असलं तरी ते उष्ण असतं. त्यामुळं पचनाचे त्रास, थायरॉईडच्या समस्या किंवा त्वचेच्या समस्या असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात बाजरी समाविष्ट करणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

Comments are closed.