प्रशांतनंतर, सीएसकेने कार्तिकला 30 लाखांच्या बेस प्राइस विरुद्ध 14.20 कोटी रुपयांना विकत घेऊन रचला इतिहास!

अबू धाबी येथे होत असलेल्या आयपीएल 2026 साठीच्या मिनी लिलावात, चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांनाही प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या दोन्ही खेळाडूंची मूळ किंमत (बेस प्राइस) 30 लाख रुपये होती. चेन्नईने सुरुवातीपासूनच या दोन्ही खेळाडूंसाठी जोर लावला आणि शेवटी त्यांना संघात घेतले. हे दोन्ही अनकॅप्ड भारतीय, लीगच्या इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड भारतीय खेळाडू बनले आहेत.

लिलावाच्या सुरुवातीलाच केकेआरने ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, तर पथिरानाला 18 कोटी रुपयांना. याव्यतिरिक्त, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने वेंकटेश अय्यरला 7 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले आहे, तर राजस्थान रॉयल्सने रवी बिश्नोईला 7.2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे

Comments are closed.