आयपीएल इतिहासातील मागील 6 लिलावांत 'या' खेळाडूंवर झाली कोट्यवधींची उधळण, पाहा संपूर्ण यादी!

अबू धाबी येथे सुरू असलेल्या आयपीएल 2026 मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनसाठी (Camron green) आपली तिजोरी खुली केली. केवळ 2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या ग्रीनला केकेआरने 25.20 कोटी रुपयांच्या प्रचंड बोलीवर विकत घेतले.

यासह ग्रीन आता आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू आणि या मिनी लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

आयपीएलच्या लिलावात अनेकदा खेळाडूंवर मोठी बोली लावली जाते. यंदा कॅमेरून ग्रीनची लॉटरी लागली आहे. यापूर्वी 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंत हा 27 कोटी रुपयांसह लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने खरेदी केले होते.

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे 10 खेळाडू!
ऋषभ पंत रु 27.00 कोटी लखनौ सुपर जायंट्स 2025
श्रेयस अय्यर 26.75 कोटी पंजाब किंग्स 2025
कॅमेरून ग्रीन 25.20 कोटी कोलकाता नाईट रायडर्स 2026
मिचेल स्टार्क 24.75 कोटी कोलकाता नाईट रायडर्स 2024
वेंकटेश अय्यर 23.75 कोटी कोलकाता नाईट रायडर्स 2025
पॅट कमिन्स 20.50 कोटी सनरायझर्स हैदराबाद 2024
सॅम करन 18.50 कोटी पंजाब किंग्स 2023
अर्शदीप सिंग 18.00 कोटी पंजाब किंग्स 2025
युजवेंद्र चहल 18.00 कोटी पंजाब किंग्स

2024: मिचेल स्टार्क (24.75 कोटी)
2023: सॅम करन (18.5 कोटी)
2022: ईशान किशन (15.25 कोटी)
2021: ख्रिस मॉरिस (16.25 कोटी)
2020: पॅट कमिन्स (15.5 कोटी)

Comments are closed.