दर मिनिटाला ५०० हून अधिक सायबर गुन्हे.
एआयमुळे वाढला धोका : दिल्ली, महाराष्ट्र, गुजरातमध्ये अधिक प्रमाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय. ऑनलाइन फसवणूक, डाटाचोरी आणि हॅकिंगच्या वाढत्या प्रकरणांमुळे सायबर सुरक्षेची गरज पूर्वीपेक्षा अधिक निर्माण झाली आहे. यामुळे सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कंपन्या वेगाने वाटचाल करत आहेत. तर नव्या डाटानुसार देशात दर मिनिटाला 505 हून अधिक सायबर गुन्हे उघडकीस येत आहेत. सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे सर्वाधिक महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतून उघडकीस येत आहेत.
भारतात सायबर सुरक्षा उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपन्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वेगाने वाढली आहे. कंपन्यांची संख्या 400 हून अधिक झाली आहे. मागील 5 वर्षांमध्sय या कंपन्यांमध्ये सरासरी 34 टक्क्यांची तीव्र वाद नोंदली गेली आहे. भारतात 2020 साली या कंपन्यांची एकूण वार्षिक व्यवसाय 1.05 अब्ज डॉलर्स होता. तर सायबर सुरक्षा उत्पादन कंपन्यांचा महसूल 2026 पर्यंत वाढून सुमारे 6 अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे. हे प्रमाण मागील वर्षी 4.46 अब्ज डॉलर्स राहिले होते असे भारतीय डाटा सुरक्षा परिषदेच्या (डीएससीआय) नव्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार 55 टक्के कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम करत करत आहेत. त्यांचे प्रमुख ग्राहक अमेरिका, पश्चिम आशिया आणि दक्षिणपूर्व आशियाच्या देशांमधील आहेत. हे देश या कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण बाजारपेठ ठरत आहेत. अनेक सायबर सुरक्षा कंपन्यांचे ग्राहक विदेशांमध्ये आहेत, परंतु या कंपन्या थेट स्वरुपात तेथे काम करत नाहीत. केवळ 17 टक्के कंपन्यांचीच विदेशात कार्यालये आहेत. याचमुळे बहुतांश कंपन्या अन्य भागीदारांद्वारे तेथे सेवा प्रदान करत आहेत.
सायबर सुरक्षा कंपनी सीक्राइटने ऑक्टोबर 2024 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत 26.55 कोटी सायबर घटनांचा शोध लावला. याचा अर्थ दर मिनिटाला 505 हून अधिक सायबर घटना समोर आल्या. डीएससीआयच्या अहवालानुसार या सायबर हल्ल्यांपैकी जवळपास 31 टक्के प्रकरणांमध्ये एआयद्वारे पुरवठासाखळीवर हल्ले आणि समन्वित पद्धतींचा वापर करण्यात आला. तर जवळपास 29 टक्के सायबर हल्ले खासगी मेलवेयर आणि एआय आधारित तंत्रज्ञानांशी निगडित होते.
Comments are closed.