आसाममध्ये २७ कोटी रुपयांच्या याबा गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत
कछार पोलिसांनी मिळविले मोठे यश
गुवाहाटी:
आसाममध्ये कछार पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी 90 हजार याबा टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. या अमली पदार्थांची किंमत जवळपास 27 कोटी रुपये आहे. आसाममध्ये सुरू असलेल्या अँटीनार्कोटिक्स ऑपरेशनच्या अंतर्गत पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. याबा टॅबलेट्स असे अमली पदार्थ आहेत, ज्यात मेथामफेटामाइन आणि कॅफीनचे मिश्रण असते. हा पदार्थ लोकांच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर प्रभाव पाडतो. अशाप्रकारच्या अमली पदार्थांची निर्मिती दक्षिणपूर्व आशियात केली जाते. कछार पोलिसांनी मिझोरमच्या चम्फाई जिल्ह्dयातून गुवाहाटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला रोखले. पोलिसांनी शोध घेतला असता एका डब्यात 90 हजार याबा टॅबलेट्स आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी दालिम उद्दीन लस्कर आणि आबेद सुल्तान बरभुइया या दोघांना अटक केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी पोलिसांच्या या साहसी मोहिमेचे कौतुक केले आहे. तर ही मोहीम गुप्तचर इनपूटच्या आधारावर राबविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Comments are closed.