सेलिना जेटलीने पतीकडे मागितले 100 कोटी

बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिचा पती पीटर हॅगविरोधात कोर्टात याचिका दाखल केली असून 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तसेच दर महिन्याला 10 लाख रुपये मेंटेनेन्सची मागणी केली आहे. सेलिनाने पतीवर मारहाण आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. सेलिनाच्या या याचिकेवर कोर्टाने दोघांनाही 27 जानेवारीपर्यंत उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कौटुंबिक हिंसाचारांतर्गत तक्रारीवर उत्तर मागवले आहे. लग्न झाल्यापासून मागील 15 वर्षांच्या काळात पतीने शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक शोषण केल्याचा आरोप सेलिना जेटली हिने केला आहे. पतीने आर्थिक स्वातंत्र्य दिले नाही. प्रोफेशनल कामात पीटरने हस्तक्षेप केला. त्यामुळे मला पूर्णपणे पतीच्या पैशांवर अवलंबून राहावे लागले, असे गंभीर आरोप सेलिना जेटली हिने केले आहेत. याचिकेत म्हटले की, पीटरने सेलिना आणि मुलांना ऑस्ट्रेयाच्या एका गावात सोडले. एका शेजाऱयाच्या मदतीने सेलिना तेथून निघाली. पीटरने ऑस्ट्रेयाच्या कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

Comments are closed.