देशात दर मिनिटाला 500 सायबर गुन्हे! गुह्यात महाराष्ट्र अव्वल, गुजरात दुसरे तर दिल्ली तिसऱ्या स्थानी

देशभरात सायबर गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी आणि हॅकिंगच्या घटनेत वाढ झाली असून देशात दर मिनिटाला 500 हून अधिक गुन्हे होत असल्याची धक्कादायक माहिती भारतीय डेटा सुरक्षा परिषद (डीएससीआय) च्या अहवालातून समोर आली आहे. सायबर गुन्हेगारीद्वारे होणाऱया आर्थिक फसवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर असून दुसऱया स्थानावर गुजरात तर तिसऱ्या स्थानी दिल्ली आहे.

सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करत असलेल्या हिंदुस्थानी कंपन्या वेगाने पुढे जात आहेत. हिंदुस्थानात सायबर सुरक्षा उत्पादन बनवणाऱया कंपन्यांची संख्याही आधीच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. ही संख्या आता 400 हून अधिक झाली आहे. मागील पाच वर्षात यामध्ये सरासरी 34 टक्के वाढ झाली आहे. हिंदुस्थानात 2020 मध्ये कंपन्यांचा एकूण वार्षिक व्यापार 1.05 अब्ज डॉलर होतो. तर सायबर सुरक्षा उत्पादन कंपन्यांचे नेटवर्थ 2026 पर्यंत वाढून जवळपास 6 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. जो मागील वर्षी 4.46 अब्ज डॉलर होती. अहवालानुसार, 55 टक्के कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात काम करत आहेत. यात प्रमुख ग्राहक अमेरिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देश आहेत. हे देश या कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण बाजारात दिसत आहेत. अनेक सायबर सुरक्षा कंपन्यांचे ग्राहक विदेशात आहेत. परंतु, या कंपन्या थेटपणे काम करत नाहीत. केवळ 17 टक्के कंपन्यांचे विदेशात कार्यालय आहे.

26.55 कोटी सायबर घटना

देशात कर्नाटक, दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्र यांची प्रमुख बाजारपेठ आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गुह्यात सर्वात जास्त आहे. सायबर सुरक्षा कंपनी सीक्राइटच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान, 26.55 कोटी सायबर घटना उघडकीस आल्या आहेत. याचाच अर्थ प्रत्येक मिनिटाला 505 हून अधिक सायबर गुन्हे घडले आहेत.

Comments are closed.