यमला पगला दीवाना’ पुन्हा थिएटरमध्ये; री-रिलीजमधून धर्मेंद्र यांना भावनिक श्रद्धांजली – Tezzbuzz
हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांचा सुपरहिट चित्रपट ‘यमला पगला दीवाना’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटाचे हक्क असलेल्या एनएच स्टुडिओजचे मालक श्रेयांश हिरावत यांनी मीडीयाशी बोलताना या विशेष उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि चित्रपटाशी जोडलेल्या अनेक भावनिक आठवणी शेअर केल्या.
‘यमला पगला दीवाना’च्या पुनर्प्रकाशनाबाबत बोलताना श्रेयांश म्हणाले, सुरुवातीला आम्ही डिसेंबरमध्ये धर्मेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणामुळे हा निर्णय पुढे ढकलणे योग्य वाटले. हा केवळ व्यावसायिक नव्हे तर पूर्णपणे भावनिक निर्णय होता. कोणतीही गोष्ट अत्यंत आदराने आणि योग्य वेळीच व्हावी, अशी आमची इच्छा होती. त्यामुळे काही काळासाठी प्रदर्शन पुढे ढकलले. मात्र ‘यमला पगला दीवाना’ लवकरच पुन्हा थिएटरमध्ये परत येणार, हे नक्की.
चित्रपटाशी निगडित आठवणी सांगताना श्रेयांश भावुक झाले. ते म्हणाले, हा चित्रपट आमच्यासाठी अतिशय खास आहे, कारण आम्ही ‘यमला पगला दीवाना’ थेट धर्मेंद्रजींकडून घेतला होता. 2012 साली मी मुंबईतील सनी सुपर साउंडच्या ऑफिसमध्ये जाऊन चित्रपटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. तो माझ्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ होता आणि मी व्यवसाय शिकत होतो. त्या वेळी धर्मेंद्रजी, सनी देओल सर आणि इतर सर्वजण उपस्थित होते. त्यांचा विश्वास, त्यांची उबदारता आणि तेथील संभाषण आजही माझ्या मनात ताजे आहे. म्हणूनच हा चित्रपट आमच्यासाठी केवळ एक प्रोजेक्ट नसून एक जिव्हाळ्याची आठवण आहे.
धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल (Bobby Deol)यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘यमला पगला दीवाना’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लवकरच थिएटरमध्ये परतणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
जिया शंकर हिचा हॉट लुक व्हायरल; सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
Comments are closed.