काव्या मारनने CSK ला गंडवलं, नंतर जोरजोरात हसली; IPL च्या ऑक्शनमध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO

आयपीएल लिलाव 2026 काव्या मारन व्हिडिओ: 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे झालेल्या आयपीएलच्या लिलावात (IPL 2026 Auction) एकूण 77 खेळाडू खरेदी करण्यात आले. विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये 48 भारतीय आणि 29 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. आयपीएलमधील सर्व संघांनी एकूण 215.45 कोटी रुपये खर्च केले. आयपीएलच्या मिनी लिलावात कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएलच्या या लिलिवात अनकॅप्ड खेळाडूंवरही 63.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले. महत्वाचे म्हणजे चेन्नई सुपर किंग्सने दोन अनकॅप्ड खेळाडूंसाठी तब्बल 28 कोटी रुपये मोजले.

30 लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या प्रशांत वीरसाठी (Prashant Veer) सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनेही बोलीत उडी घेतली, ज्यामुळे प्रशांतवरची बोली झपाट्याने वाढत गेली. अखेर चेन्नईने प्रशांत वीरला तब्बल 14.20 कोटी रुपयांना खरेदी केले. या खरेदीसह प्रशांत वीर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक किमतीचा अनकॅप्ड खेळाडू ठरला. त्याचवेळी कार्तिक शर्मा यांच्यासाठीही ऑक्शनमध्ये तितकीच रंगत दिसून आली.

IPL च्या ऑक्शनमध्ये नेमकं काय घडलं? (IPL Auction 2026 SRH vs MI Kavya Maran)

कार्तिक शर्मासाठी (Kartik Sharma) देखील चेन्नई आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरस झाली.  काही वेळातच ही बोली 11 कोटी रुपयांच्या पुढे गेली. यानंतर सनराझर्स हैदराबादने देखील बोली लावली.  अखेर चेन्नईने कार्तिक शर्मालाही 14.20 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. सनराझर्स हैदराबादला कार्तिक शर्माला घ्यायचे नव्हते, असं एकंदरीत दिसून आले. कारण चेन्नईने अनकॅप्ड खेळाडू असलेल्या कार्तिक शर्मासाठीही 14.20 कोटी रुपये खर्च केल्यानंतर सनराझर्स हैदराबादची मालकीण काव्य मारन (Kavya Maran) हसत राहिली. त्यामुळे काव्या मारनने चेन्नईला गंडवल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

आयपीएल 2026 साठी सनरायझर्स हैदराबादचा संघ- (IPL 2026 SRH Full Squad)

पॅट कमिन्स (कर्ंधर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मृती, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, झीशान कुमार हुसेन, शिवांग कुमार, अरविंद अरविंद, अरविंद अरविंद. तरमळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेनस फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स.

संबंधित बातमी:

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI

आणखी वाचा

Comments are closed.