इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमान कोसळले, विमान कारखान्याच्या छताला धडकले, 7 ठार

मेक्सिको विमान अपघात: मेक्सिकोमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान खासगी जेटचा मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विमान अकापुल्कोहून टेक ऑफ करून टोलुकाच्या दिशेने जात होते. इमर्जन्सी लँडिंगवेळी विमान कारखान्याच्या छताला धडकले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण बेपत्ता आहेत.
विमान अपघाताचे कारण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर विमानाने फुटबॉलच्या मैदानावर उतरण्याचा प्रयत्न केला, पण जवळच्या कारखान्याच्या धातूच्या छताला धडकले आणि विमानाला आग लागली. आगीमुळे जवळपास 130 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृतांची ओळख आणि अपघातामागचे खरे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Comments are closed.