माधुरी हत्तीण लवकरच नांदणी मठात

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वतिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाच्या महादेवी तथा माधुरी हत्तीणीच्या आरोग्याविषयी पडताळणी करण्याचे उच्चस्तरीय चौकशी समितीने ठरवले होते. या संदर्भात उच्चस्तरीय समितीकडून नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जो संयुक्त प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्या हत्ती पुनर्वसन केंद्राच्या उभारणीसाठी बांधकाम अनुमती देण्यात आली आहे. यामुळे माधुरी हत्तीण लवकरच नांदणी मठात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पुनर्वसन केंद्रास विविध प्रकारच्या अनुमती लागणार असून, त्याची प्रक्रिया लवकरच चालू करण्यात येणार आहे. या केंद्राचे बांधकाम तसेच सुविधा कशा देणार, याची माहिती उच्चस्तरीय समितीला द्यावी लागणार आहे. यानंतर माधुरी परत येण्याच्या संदर्भात पुढील प्रक्रिया चालू होईल.

Comments are closed.