पैसे कमी, तरीही कॅमेरॉनवर पहिली बोली लावली; आकाश अंबानींनी सांगितलेलं कारण ऐकून तुम्हीही कराल स
IPL 2026 लिलाव मुंबई इंडियन्स: आयपीएल 2026 च्या लिलावात (IPL 2026 Auction) सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) ठरला. कॅमेरॉन ग्रीनला केकेआरने 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले. कॅमेरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू देखील बनला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. 2023 मध्ये ग्रीनला 17.50 कोटी रुपयांमध्ये आरसीबीने खरेदी केले होते.
26 वर्षीय कॅमेरॉन ग्रीनने 2013 मध्ये आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण केले. त्या हंगामात, कॅमेरॉन ग्रीनने मुंबई इंडियन्ससाठी 16 सामन्यांमध्ये 452 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये, कॅमेरॉन ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला. गेल्या हंगामात कॅमेरॉन ग्रीन 13 सामन्यांमध्ये 255 धावा केल्या आणि 10 विकेट्स पटकावल्या. कोलकाता नाईट रायडर्स कॅमेरॉन ग्रीनचा आता तिसरा आयपीएल संघ ठरला आहे. (Mumbai Indians First Bid Cameron Green )
खिशात पैसे कमी असतानाही मुंबईने कॅमेरॉन ग्रीनवर पहिली बोली लावली- (First bid Cameron Green)
यंदा मुंबईचा संघ लिलावात सर्वात कमी 3 कोटींपेक्षाही कमी पैसे घेऊन आला होता. लिलावाआधी मुंबईने ट्रेड डील करत तीन खेळाडूंना संघात दाखल करुन घेतले होते. त्यासोबत त्यांनी तब्बल 17 खेळाडूंना रिटेन केले. त्यामुळे लिलावात उतरताना त्यांच्याकडे फारसे पैसे शिल्लक नव्हते. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी लिलावात एक कृती केली, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. पर्समध्ये पैसे नसतानाही कॅमेरॉन ग्रीनवर पहिली बोली लावली. मुंबईच्या या कृतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र यामागचं खरं कारण आकाश अंबानी यांनी लिलावादरम्यानच्या मुलाखतीत सांगितलं.
आकाश अंबानी म्हणाले, “आम्ही कॅमेरून ग्रीनसाठी बोली लावली ते सांगण्यासाठी की आम्ही त्याची कदर करतो. जेव्हाही तो लिलावात उपलब्ध असेल तेव्हा तो आमच्या विचारांमध्ये असेल, आमचा पॅडल त्याच्यासाठी जाईल”. pic.twitter.com/YATi4B4G4c
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) १६ डिसेंबर २०२५
कॅम ग्रीनसाठी पहिली बोली 🙋♂️😂 pic.twitter.com/nvPYLrPWfh
— मुंबई इंडियन्स (@मिपल्टन) १६ डिसेंबर २०२५
आकाश अंबानी नेमकं काय म्हणाले? (Akash Ambani Mumbai Indians)
कॅमेरॉन ग्रीन हा उत्तम खेळाडू आहे. त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्याच संघातून आणले. तो फक्त चांगला क्रिकेटपटू नाहीय, तर खूप चांगला माणूसही आहे. कॅमेरॉन ग्रीनला आम्ही विकत घेऊ शकत नव्हतो, याबाबत आम्हाला पूर्णपणे कल्पना होती. परंतु कॅमेरॉन ग्रीनविषयी आमच्या मनात आदर आहे. तो आदर दाखवण्यासाठीच आम्ही लिलावात कॅमेरॉन ग्रीनवर पहिली बोली लावली, असं मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी सांगितले.
आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-(IPL 2026 MI पूर्ण संघ)
हार्दिक पंड्या (कर्ंधर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघु शर्मा, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक शेरफर्ड, मार्क्स चहर, विल जॅक चहर, रॉबिन शेरडे, रॉबिन बॉश. शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इझार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत.
QdK बायबॅक ✅
स्मार्ट आधारभूत किंमत निवड ✅
MI मार्गाचे नियोजन ✅टीम ओनर आकाश अंबानी यांनी लिलावाची रणनीती तोडली 👇https://t.co/mhMjDa6Zfo
— मुंबई इंडियन्स (@मिपल्टन) १६ डिसेंबर २०२५
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.