कधी रस्त्यावर नाटक करणारा अभिनेता आज ऑस्कर ज्यूरीचा सदस्य; सुपरहिट चित्रपटाने बदलले आयुष्य – Tezzbuzz
‘होमबाउंड’ या चित्रपटाची 2026 च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. या यशावर चित्रपटाचे निर्माता करण जोहर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. मात्र, याच दरम्यान बॉलिवूडमधील आणखी एका स्टारने जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे.
तो स्टार म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurana). आयुष्मान याने यावर्षी अकादमी पुरस्कारांच्या (ऑस्कर) ज्युरी सदस्य म्हणून काम केले आहे. अकादमी पुरस्कारांचे सीईओ बिल क्रेमर आणि अध्यक्ष जेनेट यांग यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, “चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना अकादमीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.”
या यादीत आयुष्मान खुरानासह अनेक भारतीय कलाकारांचा समावेश होता. कास्टिंग डायरेक्टर करण मल्ली, सिनेमॅटोग्राफर रणबीर दास, कॉस्च्युम डिझायनर मॅक्सिमा बसू, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर स्मृती मुंध्रा आणि दिग्दर्शिका पायल कपाडिया यांनाही अकादमीमध्ये सामील होण्याचे आमंत्रण देण्यात आले.
2025 हे वर्ष आयुष्मान खुरानासाठी खास ठरले आहे. त्याचा ‘थामा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली.आयुष्मान खुरानाने 2012 मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने त्याला स्टारडम मिळवून दिले. आजपर्यंत त्याने 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून तो केवळ अभिनेता नाही तर उत्तम गायक आणि कवीही आहे. अलीकडेच त्याने लिहिलेली कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.