एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावाच्या रिसॉर्टमध्ये सापडलं 145 कोटींचं ड्रग्ज; सुषमा अंधारेंनी फोडला बॉम्ब, पोलीस अधीक्षकांनी माहिती लपवल्याचा आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळ असणाऱ्या एका रिसॉर्टवर पोलिसांनी धाड टाकत 45 किलोंचे अंमली पदार्थ जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या अंमली पदार्थांची किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात असणाऱ्या रिसॉर्टवर ही कारवाई करण्यात आली होती. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांचे असून त्यांनी ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती. मात्र साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी ही सर्व माहिती लपवून ठेवली, असा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत फोडला.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.