Jeans- Top Fashion Tips: चुकीचा फॅशन सेन्स फॉलो करताय? जीन्सच्या रंगानुसार निवडा टॉप
जीन्स म्हणजे प्रत्येकाच्या वॉर्डरोबचा अविभाज्य भाग असते. कारण जीन्स कधीही आऊट ऑफ फॅशन जात नाही. वेगवेगळ्या प्रकारचं जीन्स कलेक्शन प्रत्येक कॉलेज गर्ल, वर्किंग वूमनकडे असतं. मात्र बऱ्याचदा घाईत असताना आपल्याकडून नकळत चुकीचा फॅशन सेन्स फॉलो केला जातो. कोणत्याही रंगाच्या जीन्सवर कोणताही टॉप मॅच होतो असा आपला समज असतो. खरं तर जीन्सच्या रंगानुसार सूट होणारा टॉप घातल्यास तुमचा लूक अधिक चांगला दिसतो.
कॉलेज, ऑफिस, पार्टी किंवा कॅज्युअल आउटिंग असो… प्रत्येक प्रसंगासाठी जीन्स वेगवेगळ्या टॉप्स आणि शर्टसह स्टाइल केल्या जातात. पण बहुतेकदा, कोणत्या जीन्ससह कोणता रंग निवडायचा हे ठरवणं कठीण होतं. त्यासाठीच आपण टिप्स जाणून घेऊया… ( How to choose tops according to color of jeans ? )
गडद निळ्या जीन्स
डार्क ब्लू जीन्स ही सर्वात जास्त पसंत केली जीन्स मानली जाते. यावर पांढऱ्या रंगाचा टॉप किंवा शर्ट नेहमीच शोभून दिसतो. अगदी कॉलेज ते ऑफिसपर्यंत तुम्ही हे कॉम्बिनेशन मिरवू शकता. तसेच काळ्या टॉपसोबत डार्क ब्लू जीन्स घातल्याने क्लासिक आणि स्मार्ट लूक मिळतो. या रंगाच्या जीन्सवर तुम्ही गुलाबी आणि पिवळ्यासारखे चमकदार रंगाचे टॉप देखील स्टाईल करू शकता.
लाईट ब्लू जीन्स ( आकाशी )
लाईट ब्लू जीन्सवर हलके रंग शोभून दिसतात. त्यावर पांढरा टॉप हा एक क्लासिक पर्याय ठरतो, तसेच बेज रांगामुळं एलिगंट लूक मिळू शकतो. या जीन्सवर लैव्हेंडर आणि मिंट ग्रीन सारखे सॉफ्ट शेड्सही स्टायलिश दिसतात.
काळी जीन्स
काळी जीन्स प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण ठरते. त्यावर लाल रंगाचा टॉप एक बोल्ड आणि कॉन्फिडेंट लूक देतो. डिनर नाईट, पार्टीसाठी ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन परफेक्ट ठरतं. पांढरा टॉप देखील काळ्या जीन्ससोबत स्टायलिश दिसतो. तसेच राखाडी आणि हिरव्या रंगाचे शेड्स सोबर लूक देतात.
पांढरी जीन्स
पांढऱ्या जीन्सवर चमकदार आणि गडद दोन्ही रंग जुळतात. निळा, नारंगी आणि लाल रंगाचे टॉप घातल्यास एक आकर्षक कॉन्ट्रास्ट लूक तयार होतो. यावर पेस्टल शेड्स देखील चांगले दिसतात.
राखाडी जीन्स
राखाडी जीन्स आधुनिक आणि स्टायलिश लूक देतात. राखाडी जीन्सवर काळे टॉप घातल्याने स्लिम आणि शार्प लूक येतो. तसेच ऑफिस वेअरसाठी त्यावर नेव्ही ब्लू टॉप हा एक चांगला पर्याय ठरतो. कॅज्युअल आउटिंगसाठी राखाडी जीन्सवर जांभळा आणि हलका गुलाबी रंगही सूट होतात.
Comments are closed.