रिकेल्टन की डी कॉक, रोहितसोबत ओपनिंग कोण करणार? IPL 2026 मध्ये अशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन
आयपीएल 2026 (IPL 2026) च्या लिलावात मुंबई इंडियन्स (MI) चा संघ बराच काळ शांत दिसला. त्यांनी पहिली बोली कॅमरून ग्रीनसाठी (Camron Green) लावली खरी, पण तो त्यांच्या बजेटच्या बाहेर गेला. या लिलावात मुंबईने क्विंटन डी कॉकसह (Quiten De Cock) एकूण 5 खेळाडूंवर डाव लावला.
निवडक खेळाडू खरेदी करूनही, आगामी हंगामासाठी मुंबईची प्लेइंग इलेव्हन अत्यंत ताकदवान वाटत आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली मुंबईचा संघ 19 व्या हंगामात धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुंबईने क्विंटन डी कॉकला खरेदी केल्यामुळे संघासमोर एक गोड अडचण निर्माण झाली आहे. रोहित शर्माचा (Rohit Sharma) जोडीदार म्हणून क्विंटन डी कॉक की रयान रिकेल्टन? हा मोठा प्रश्न असेल. रिकेल्टनने गेल्या हंगामात मुंबईसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांत त्याला संधी मिळू शकते. मात्र, डी कॉकचा आयपीएलमधील अनुभवही दांडगा आहे.
आगामी हंगामात मुंबईच्या फलंदाजांचे खेळण्याचे क्रमांक असे असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव तर
चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर विल जॅक्स किंवा रदरफोर्ड तसेच
सहाव्या क्रमांकावर कर्णधार हार्दिक पांड्या आणि फिनिशर नमन धीर खेळण्याची शक्यता आहे.
स्पिन विभागाची जबाबदारी मिचेल सँटनरकडे असेल, तर वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करेल. बुमराहला साथ देण्यासाठी ताफ्यात ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर असतील.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन/क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर.
Comments are closed.