भारतासमोर सुवर्णसंधी, पण कर्णधार-उपकर्णधाराच्या फॉर्मवरच प्रश्नचिन्ह, थोड्याच वेळात नाणेफेक
India vs South Africa 4th T20 LIve Updtae Marathi : भारतीय क्रिकेट संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवण्याच्या निर्धाराने लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर मैदानात उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सध्या 2-1 अशी आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकताच भारताला ही मालिका आपल्या नावावर करता येणार आहे. मात्र, या निर्णायक लढतीआधी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिलच्या खराब फॉर्मने संघाची चिंता वाढवली आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये हे दोन्ही फलंदाज अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. महत्त्वाच्या सामन्याआधी त्यांचा फॉर्म परत येणे टीम इंडियासाठी अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
Comments are closed.