भारत-दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-20 मधून शुबमन गिल बाहेर! 'प्लेइंग 11' मध्ये कोण घेणार जागा? मोठी अपडेट समोर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात शुबमन गिल (Shubman gill) खेळणार नाही. पायाच्या दुखापतीमुळे त्याला या सामन्यातून विश्रांती घ्यावी लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सराव सत्रादरम्यान (Training Session) गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या जागी आता संजू सॅमसनला (Sanju Samson) ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार असलेल्या शुबमन गिलने या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत केवळ 32 धावा केल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील हा चौथा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होता, परंतु धुक्यामुळे (Smog/Mist) नाणेफेकीला (Toss) उशीर झाला आहे. गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने (BCCI) अद्याप कोणतेही अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलेले नाही.
शुबमन गिल संघाबाहेर गेल्यामुळे संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. सॅमसनने या मालिकेत आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. मात्र, चौथ्या सामन्यात तो अभिषेक शर्मासोबत सलामीला (Opening) उतरताना दिसू शकतो.
Comments are closed.