‘प्रसादा’साठी धनुभाऊंचे शहा-दर्शन!

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना ते शक्य झाले नव्हते, मात्र आज धनुभाऊ ‘प्रसादा’साठी शहा-चरणी दाखल झाले. एकीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचे वॉरंट निघालेले असताना अचानक दिल्लीत झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना आपल्या दिल्ली दौऱयाची कोणतीही पूर्वकल्पना न देताच मुंडे बुधवारी दिल्लीत दाखल झाले आणि अमित शहा यांची भेट घेतली. जवळपास एक तास ते संसद भवनात होते. यावेळी त्यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती मिळत आहे.

… तर बीडमध्ये टोळीराज येईल!

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास बीड जिल्हय़ात पुन्हा टोळीराज तयार होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

  • परळी वैजनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतार्ंलग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करावा. या योजनेच्या माध्यमातून ज्योतार्ंलग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्ट करत म्हटले आहे.

Comments are closed.