चित्रपट फ्लॉप ठरला तरी कपिल शर्माचा शोचा चौथा सीझन ठरणार हिट? प्रियांका चोप्रासोबत रंगणार धमाल – Tezzbuzz
कपिल शर्माचा चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असला, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र आता कपिल शर्मा आपल्या सुपरहिट कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या चौथ्या सीझनसह भव्य पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. शोचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये कपिलसोबत प्रियांका चोप्रा धमाल करताना दिसत आहे. हा सीझन पाहून चाहते आधीच सुपरहिट असल्याचे सांगत आहेत.
कपिल शर्माने (Kapil Sharma)आपल्या इंस्टाग्रामवर सीझन 4 चा प्रोमो शेअर केला होता, ज्यामध्ये जुनी स्टारकास्ट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. आता नेटफ्लिक्सने शोमधील पाहुणी प्रियांका चोप्राची झलक दाखवणारा नवा प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमोमध्ये कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत प्रियांकाची एंट्री शोमध्ये वेगळीच रंगत आणताना दिसते. कपिलचा खट्याळ विनोद आणि प्रियांकाची झटपट बुद्धी यामुळे हा सीझन हिट ठरणार, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
कपिल शर्मा आणि प्रियांका चोप्राची जोडी प्रेक्षकांसाठी नवी नाही. याआधीही प्रियांका तब्बल सहा वेळा कपिलच्या शोमध्ये दिसली आहे. 2013 मध्ये ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये ‘जंजीर’च्या प्रमोशनसाठी ती पहिल्यांदा आली होती. त्यानंतर 2014 मध्ये ‘गुंडे’, 2015 मध्ये ‘मेरी कोम’ आणि ‘दिल धडकने दो’, तर 2017 आणि 2019 मध्ये ‘द स्काय इज पिंक’च्या प्रमोशनसाठी ती कपिलच्या शोमध्ये झळकली होती. प्रत्येक वेळी प्रियांकाने तिच्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.
आता पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कपिल शर्मासोबत धमाल करताना दिसणार आहे.सीझन 4 चा प्रीमियर 20 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.