Water Therapy : काय आहे जपानी वॉटर थेरपी ? जाणून घ्या त्याचे फायदे
शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊन अनेक रोगांचा धोका निर्माण होतो. पाण्याचा आपल्या त्वचेवर आणि केसांवरही चांगला परिणाम होतो. त्यामुळे तज्ज्ञ एका व्यक्तीने सुदृढ राहण्यासाठी सुमारे 8 ग्लास पाणी प्यावे असे सांगतात. जपानी लोक फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य म्हणून पाण्याकडे पाहतात आणि विशिष्ट प्रकारच्या वॉटर थेरपीचा सराव करतात. ही थेरपी विशेषत: वजन कमी करण्यासाठी आणि शरीर फिट ठेवण्यासाठी ओळखली जाते. ही थेरपी नक्की कशी केली जाते? जपानी वॉटर थेरपीचे शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घेऊयात सविस्तरपणे
जपानी वॉटर थेरपी म्हणजे सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता पाणी पिणे. शक्यतो कोमट पाणी पिण्यावर भर देणे. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहज निघून जातात. या थेरपीच्या नियंमानुसार ब्रथ केल्यानंतर 45 मिनिटांनीच पाणी प्यावे. ब्रश तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उभे राहून पाणी पिऊ नये. एका जागी बसून पाणी प्यावे.
हेही वाचा – Dry Fruits: हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट्स खावेत
फायदे –
- जपानी वॉटर थेरपीमुळे ताणतणाव दूर होतो.
- वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ही जपानी थेरपी खूप उपयुक्त असते.
- पचनसंस्था सुधारल्याने दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते.
- केसांच्या समस्या कमी होऊन केसवाढीस प्रोत्साहन मिळते.
- त्वचेच्या समस्या असतील तर जपानी वॉटर थेरपी फॉलो करावी.
हेही वाचा – Food Poisoning Remedies: उलट्या, जुलाबाच्या त्रासाने हैराण झालात? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम
Comments are closed.