डेव्हॉन कॉनवे-टॉम लॅथम जोडीने मिळून विश्वविक्रम रचला, हे NZ च्या ९५ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडले.

किवी कर्णधार लॅथमने 246 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार मारत 137 धावा केल्या. कॉनवे 279 चेंडूंत 178 धावा करून नाबाद राहिला, ज्यात त्याने 25 चौकार मारले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली आणि कॉनवे-लॅथम यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 86.4 षटकांत 323 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडच्या 95 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्या विकेटसाठी 300 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही दुसरी वेळ आहे.

याआधी १९७२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ग्लेन टर्नर आणि टेरी जार्विस यांनी पहिल्या विकेटसाठी ३८७ धावांची भागीदारी केली होती.

याशिवाय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. याआधी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली होती.

सध्याच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दोघेही आघाडीवर आहेत. लॅथमने 5 डावात 326 धावा केल्या आहेत आणि कॉनवेने आतापर्यंत तितक्याच डावात 303 धावा केल्या आहेत.

Comments are closed.