सुकमा येथे झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.

वृत्तसंस्था/रायपूर

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोल्लापल्ली पोलीस स्टेशन परिसरातील जंगली आणि डोंगराळ भागात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रsही जप्त करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुकमा जिह्यातील डीआरजी पथकाने गुरुवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केल्यामुळे जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सकाळपासूनच घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात ही कारवाई तीव्र करण्यात आली. सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

सायंकाळपर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू होता. दिवसअखेरपर्यंत चकमक झालेल्या भागातून तीन मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रsही जप्त करण्यात आली आहेत. तथापि, ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख आणि जप्त केलेल्या साहित्याची संपूर्ण माहिती ऑपरेशन संपल्यानंतर दिली जाईल, असे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत नक्षलवाद्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या भागातील चकमकीत बड्या नक्षलवादी नेत्यांसह 500 हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

Comments are closed.