अवामी लीग नष्ट करणे अशक्य आहे.

शेख हसीना यांचा मोहम्मद युनूस यांच्यावर निशाणा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वत:च्या देशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला आहे. मोहम्मद युनूस हे देशाला अस्थिरतेच्या दरीत लोटत आहेत. तसेच युनूस हे राजकीय वैधता मिळविण्यासाठी पाकिस्तानशी जवळीक वाढवत असल्याचा आरोप हसीना यांनी केला आहे.

युनुसू यांच्याकडे कूटनीति करण्यासाठी जनादेश नाही तसेच अनुभव देखील नाही. बांगलादेश आणि भारताचे संबंध मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम आणि अवैध शासनामुळे बिघडले आहेत. बांगलादेशात लवकरच लोकशाही येईल आणि आमच्या पक्षाला योग्य भूमिका मिळेल अशी अपेक्षा आहे. अवामी लीग बांगलादेशचा इतिहास आणि स्वातंत्र्याशी जोडलेला आहे.आम्ही हत्येचा प्रयत्न, सैन्यराजवट आणि राजकीय दृष्ट्या संपविण्याच्या प्रयत्नांपासून बचावलो आहोत असे उद्गार हसीना यांनी काढले आहेत.

अवामी लीगला आमच्या लोकांनी 9 वेळा निवडले आहे, कारण आम्ही प्रत्येक गाव आणि वस्तीशी जोडलेलो आहोत. बांगलादेशच्या लोकांनी कायदेशीर, कूटनीतिक आणि शांतिपूर्ण मार्गांनी लढाई जारी ठेवण्याची गरज आहे. युनूस यांचा पाकिस्तानशी जवळीक साधण्याचा खेळ लाखो बांगलादेश समजू लागले आहेत. बांगलादेशचे प्रतिनिधित्व करू शकेल, अशा एका नेत्याची प्रतीक्षा भारत करतोय. भारताच्या संयमाचे मी कौतुक करते, असे शेख हसीना म्हणाल्या.

Comments are closed.