विशेष गाड्यांद्वारे टाक्या काश्मीर खोऱ्यात पोहोचल्या.
भारतीय सैन्याची मोठी कामगिरी
मंडळ/श्रीनगर
भारतीय सैन्याने लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात एक मोठा मैलाचा दगड गाठला आहे. 16 डिसेंबर रोजी सैन्याने पहिल्यांदाच मिलिट्री स्पेशल रेल्वेद्वारे काश्मीर खोऱ्यात रणगाडे, तोफा आणि डोजर यासारखी अवजड उपकरणे पेहोचविली आहेत. वॅलिडेशन एक्सरसाइजच्या हिस्स्याच्या अंतर्गत जम्मू क्षेत्रामधून अनंतनाग (काश्मीर) पर्यंत या उपकरणांना यशस्वीपणे नेण्यात आले. उत्तर सीमांवर क्षमता वाढवत भारतीय सैन्याने 16 डिसेंबर रोजी मिलिट्री स्पेशल रेल्वेद्वारे काश्मीर खोऱ्यात रणगाडे आणि तोफा पोहोचवून लॉजिस्टिक्सचा मोठा मैलाचा दगड गाठला असल्याचे सैन्याच्या अतिरिक्त महासंचालकांनी (जनसंपर्क) सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे. ही मोहीम जम्मू ते अनंतनागपर्यंत राबविण्यात आली. रणगाडे, तोफा आणि इंजिनियरिंग डोजरला रेल्वेत लादून सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले. यामुळे सैन्याच्या गतिशीलता (मोबिलिटी) आणि लॉजिस्टिक्स क्षमतेत मोठा सुधार दिसून आला. आता गरज भासल्यास अवजड शस्त्रसामग्रींना वेगाने तैनात करता येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाचे सहकार्य
हे यश रेल्वे मंत्रालयासोबत राखलेल्या समन्वयामुळे मिळाले आहे. उधमपूर-श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाचा हा परिवर्तनकारी प्रभाव असून तो वेगवान लॉजिस्टिक्स बिल्ड-अप आणि उत्तर सीमांवर मोहिमात्मक सज्जतेला मजबूत करत असल्याचे सैन्याने म्हटले आहे. यूएसबीआरएल प्रकल्प 272 किलोमीटर लांब असून हिमालयाच्या दुर्गम शिखरांमधून तो जाणारा आहे. यासाठी सुमारे 43,780 कोटी रुपये खर्च आला आहे. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते, परंतु आता सैन्यसामग्रीसाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. सप्टेंबर महिन्यात सैन्याने याच मार्गाद्वारे 753 टन सामग्री पोहोचविली होती.
संरक्षणासाठी का महत्त्वपूर्ण?
काश्मीर खोऱ्याची भौगोलिक स्थिती अवघड असून उंच पर्वत, बर्फ आणि प्रचंड थंडीच्या स्थितीमुळे अवजड उपकरणे रस्तेमार्गाने न्यावी लागत होती, याकरता अधिक वेळ लागत होता आणि जोखिमही होती. आता रेल्वेच्या माध्यमातून वेगाने आणि सुरक्षित वाहतूक शक्य आहे. यामुळे उत्तर सीमेवरील (चीन आणि पाकिस्तानला लागून) सैन्याची तयारी मजबूत होणार आहे. तसेच वेळ प्रसंगी रणगाडे-तोफा लवकरच पोहोचविता येणार असल्याने मोहिमात्मक लवचिकता वाढणार आहे.
Comments are closed.